MLA Vishwanath Bhoir, Shivsena, NCP
MLA Vishwanath Bhoir, Shivsena, NCP saam tv
मुंबई/पुणे

ताे सर्वस्वी निर्णय उद्धवजींचा ! एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारानं व्यक्त केली भावना

प्रदीप भणगे

वसई : महविकास आघडीतून (mva) बाहेर पडलो याचा अर्थ आम्ही गद्दार नाही, मी शिवसैनिकच आहे. शिवसेना (shivsena) संपवण्याचा राष्ट्रवादीचा (NCP) डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलीन झालो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको हाेती म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडलाे आहाेत. यामुळं आम्हांला जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir) यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झालेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही दिली.

उद्धवजी ठरवतील

एकनाथ शिंदे गटातील कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहेत. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या शहर प्रमुख पदाबाबत चर्चा होती. याबाबत माध्यमांशी आमदार भोईर यांना विचारले असता त्यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी (Uddhav Thackeary) पक्ष प्रमुख आहेत. त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे भोईर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचं सकारात्मक उत्तर घेईन

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी. बा. पाटील यांचा नाव देण्याबाबत भोईर यांना प्रश्न विचारल असता त्यांनी नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी. बा. पाटील यांचा नाव देण्याबाबतचा जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळात होईल. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता मात्र सदर बैठक वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेलं नाही. मात्र दी. बा यांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरू. हा इथल्या भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न आहे आणि या भूमिपुत्राचा आक्रोश आहे. त्यामुळे याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलेन आणि सकारात्मक उत्तर घेईन असे आश्वासन आमदार भाेईर यांनी दिलं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: बाळासाहेबांनी पडत्या काळात मदत केली, ते उपकार तुम्ही विसरला; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT