Nagar : अजित पवारांचा वाहनताफा शेतकऱ्यांनी अडवला, काय घडलं नेमकं? (व्हिडिओ पाहा)

आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर जिल्हा दाै-यावर आहेत.
ajit pawar, nagar, farmers
ajit pawar, nagar, farmerssaam tv
Published On

नगर : नगर (nagar) जिल्ह्यातील अकोले येथे विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांच्या वाहनाचा शेतक-यांनी (farmers) आणि भाजपा (bjp) कार्यकर्त्यांनी ताफा अडवला. यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना अटक केल्याचा निषेध आंदाेलकांनी विराेधी पक्ष नेत्यांकडे नाेंदविला. (ajit pawar latest marathi news)

माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी अकाेले येथे आले आहेत. अकोले तालुक्यातील दुर्गम अशा मावेशी, माणिक ओझर येथे त्यांनी भेट दिली. अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी त्यांना नुकसानीची माहिती विषद केली. यावेळी पवार यांनी उपस्थित अधिकारी यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सुचना केल्या.

ajit pawar, nagar, farmers
'काय झाडी, काय डोंगारनंतर आता सांगोल्याच्या शेतकऱ्याची 'ओके' ऑडिओ क्लिप व्हायरल

त्यानंतर अकोले येथे अगस्ती कारखाना निवडणूक प्रचार सभेसाठी पवार हे निघाले हाेते. या निवडणुकीत भाजपा नेते मधुकर पिचड यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पवार हे आले आहेत. त्यांच्या वाहनांचा ताफा सभास्थळी जात असताना काही शेतक-यांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी ताे अडवला. दशरथ सावंत यांना अजित पवार यांची भेट घ्यायची हाेती परंतु पवार यांनी भेट नाकारल्यानंतर पाेलीसांनी सावंत यांना ताब्यात घेतले. दशरथ सावंत यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले हाेते. मधूकर पिचड यांचा विजय असाे अशा घाेषणा देखील आंदाेलकांनी ताफा अडवल्यानंतर दिल्या. यावेळी पाेलीसांची तारांबळ उडाली हाेती. पोलीसांनी आंदोलकांना हटवल्यानंतर अजित पवार सभा स्थळी रवाना झाले.

ajit pawar, nagar, farmers
Rain Update : महाराष्ट्र- तेलंगणा मार्ग बंद; चंद्रपूरात अकरा हजार हेक्टर शेतीस फटका

दशरथ सावंतांचा इशारा

सन 2019 साली राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणा-या मधुकर पिचड आणी सिताराम गायकर यांच्या विरोधात अजित पवार यांनी सभा घेत सिताराम गायकर यांचे धोतर फेडणार अशी वल्गना केली होती मात्र आता अकोले सहकारी साखर कारखाना निवडणूकीत पिचडांना पासून बाजुला होत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सिताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार आले आहेत. त्यामुळे या गोष्टीचा जाब सभेच्या व्यासपीठावर जावून विचारणार असल्याचं शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी इशारा दिला होता.

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar, nagar, farmers
तर आम्ही...! विराेधी पक्ष नेते अजित पवारांनी एकनाथ शिंदे सरकाराला दिला इशारा
ajit pawar, nagar, farmers
'त्या' घटनेनंतर गाैरवची भावना; 'थप्पड़ से नहीं साहब…, बीवी की सरप्राइज प्लानिंग से डर लगता है...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com