Varun Sardesai and Nilam Gorhe Saam Tv News
मुंबई/पुणे

VIDEO : नीलम गोऱ्हेंच्या बॉडीगार्डचा धक्का, वरुण सरदेसाई संतापले, म्हणाले असे कसे धक्के लागतात? विधानभवनात राडा

Varun Sardesai and Nilam Gorhe : विधानभवनात जात असताना आमदार वरुण सरदेसाई यांना बॉडीगार्डचा धक्का लागल्यानं संताप व्यक्त केला. 'इथं काय अतिरेकी घुसलेत, दुसऱ्यांदा धक्का लागला मला, दुसऱ्यांदा झालं हे, असे कसे धक्के लागतात?' असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला.

Prashant Patil

मुंबई : शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डचा धक्का लागल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई चांगलेत संतापले. नीलम गोऱ्हे यांनी देखील 'मुद्दापहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती', असं म्हटलं. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते विधीमंडळ अधिवेशनात आक्रमक झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवनेसेचे अनिल परब आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात बाचाबाची झाल्याचं आपण पाहिलं.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवनात जात असताना आमदार वरुण सरदेसाई यांना बॉडीगार्डचा धक्का लागल्यानं संताप व्यक्त केला. 'इथं काय अतिरेकी घुसलेत, दुसऱ्यांदा धक्का लागला मला, दुसऱ्यांदा झालं हे, असे कसे धक्के लागतात?' असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला. यानंतर नीलम गोऱ्हे थोडं पुढं निघून गेल्या आणि 'मुद्दामहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती', असं म्हणाल्या. यानंतर नीलम गोऱ्हे विधानभवनात निघून गेल्या.

आमदार वरुण सरदेसाई म्हणाले की, 'वारंवार स्वत:ला व्हीआयपी समजणारे, एका बाजूला आम्हाला सांगितलं जातं की जास्त लोकांना आत घेऊन यायचं नाही. नीलम गोऱ्हे उपसभापती आहेत, त्यांच्या पदाचा मान राखतो. पण प्रत्येक वेळी येताना, गेल्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या लोकांचा धक्का लागला', असं सरदेसाईंनी म्हटलं आहे. विधानभवनाच्या आत जायला यायला हा एकमेव रस्ता आहे. इथं प्रचंड पोलीस सुरक्षा असते. हे दुसऱ्यांदा घडलं, गेल्या अधिवेशनात घडलेलं, यावेळी देखील घडलं. या सभागृहात आमदारांचा यथोचित मान राखला पाहिजे. आमच्या छातीवर बिल्ले लावले आहेत. या आवारात आम्ही आमदार आहोत म्हणून बिल्ले लावतो. उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी विधानभवनाच्या टेरेसवर विमान उतरवा', असा टोला देखील सरदेसाई यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Romantic Destinations : जोडीदारासोबतची सहल अविस्मरणीय बनवणारी ८ सुंदर पावसाळी ठिकाणं

US Visa: अमेरिकेचा मोठा निर्णय! व्हिसा शुल्कात १४८ टक्क्यांनी वाढ; पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला फटका

Jalgaon Crime News : दारू देण्यास नकार, तरुणांची सटकली; हॉटेल मालकावर अंदाधुंद गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Pune News: गणेशोत्सवाआधी पुण्यातील ढोल-ताशा पथकांना आनंदाची बातमी, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT