Sanjay Shirsat : आधी म्हणाले श्रीकांत शिंदेंना इनकम टॅक्सनं नोटीस पाठवली, गदारोळ होताच शिरसाटांचा यू टर्न

Sanjay Shirsat on Shrikant Shinde ED Notice : मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. मात्र, हे अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे हे काल अचानक दिल्लीत गेले होते. त्यांची ही दिल्लीवारी गुप्त होती. आज सकाळी याबाबतची माहिती समोर आली.
Sanjay Shirsat on Shrikant Shinde ED Notice
Sanjay Shirsat on Shrikant Shinde ED NoticeSaam Tv News
Published On

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर खात्याने नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती संजय शिरसाटांनी माध्यमांसमोर दिली. त्यानंतर एकच गदारोळ उडाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा संजय शिरसाटांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आणि म्हणाले की, मला याबाबत काही माहिती नाहीय, असं स्पष्टीकरण शिरसांटांनी दिलं आहे.

मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. मात्र, हे अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे हे काल अचानक दिल्लीत गेले होते. त्यांची ही दिल्लीवारी गुप्त होती. आज सकाळी याबाबतची माहिती समोर आली. दिल्लीत एकनाथ शिंदे यांना काही बडे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अशातच संजय शिरसाटांनी श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस आल्याचं वक्तव्य केलं आणि एकच गदारोळ झाला. श्रीकांत शिंदे यांना आयकर खात्याची नोटीस आल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तेवढ्यात एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आणि काही वेळातच संजय शिरसाटांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आणि श्रीकांत शिंदे यांच्याबाबत केलेलं आपलं वक्तव्य मागे घेतलं.

Sanjay Shirsat on Shrikant Shinde ED Notice
Nashik Accident: दर्शन घेऊन परतताना काळाची झडप, वाहनावर सिमेंट पावडरचं कंटेनर उलटलं, ४ जणांचा जागीच अंत

संजय शिरसाट स्पष्टीकरण देताना म्हणाले की, 'मला आयकर विभागाची नोटीस आली, हे स्पष्ट केलं. मला काही पत्रकारांनी विचारलं श्रीकांत शिंदेंनासुद्धा नोटीस आली आहे का? तर मी म्हटलं श्रीकांत शिंदेंना सुद्धा जरी नोटीस आली असेल तर मला माहीत नाही. श्रीकांत शिंदे यांना नोटीस आली की नाही हे मला माहित नाही'.

आधी संजय शिरसाट काय म्हणालेले?

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनावधनाने याबाबतची माहिती सांगितली. संजय शिरसाट यांनी म्हटले की, 'आयकर विभाग हा प्रत्येकाची तपासणी करत असतो. मला नोटीस आली आहे, श्रीकांत शिंदे साहेबांना नोटीस आली आहे. आणखी कोणाला नोटीस येत असेल. त्यामुळे आम्ही आयकर विभागाला उत्तर द्यायला बांधील आहोत. मला ९ तारखेला उत्तर द्यायला सांगितलं होतं. मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतला आहे', असं संजय शिरसाट यांनी आधी म्हटलेलं.

Sanjay Shirsat on Shrikant Shinde ED Notice
Politics: 'च्याXXX गद्दार कुणाला म्हणतो, तुला दाखवतोच' ठाकरे अन् शिंदेंच्या शिलेदाराची हमरी तुमरी; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com