Shivsena Tanaji Sawant Pune  Saam TV
मुंबई/पुणे

शिंदे साहेबांमुळे आम्ही संयम बाळगून; राजकीय प्रश्न सुटला की, जशाच तसे उत्तर देऊ : तानाजी सावंत

पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही बंडखोर आमदारांनी आपलं बंड सुरूच ठेवलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे जवळपास 40 हून अधिक आमदार गुवाहाटी येथे थांबून आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरातील शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झाले आहे. पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. दरम्यान, कार्यालयात तोडफोड केल्यानंतर आमदार तानाजी सावंत यांनी तोडफोड करणाऱ्यांना इशारा दिला आहे. (Pune Shivsena Latest Marathi News)

तान्हाजी सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतर, शिवसैनिक आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी गद्दार सावंत असं म्हणत तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान या तोडफोडीनंतर तान्हाजी सावंत यांनी एक फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्यांना इशारा दिला.

"आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं". अशी पोष्ट तानाजी सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अशातच बहुमताचा आकडा घटल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिंदे 40 हून अधिक आमदारांसह गुवाहाटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत.

माहितीनुसार एकनाथ शिंदे आता नवा गट स्थापन करणार असून या गटाचं नावही ठरवण्यात आलं आहे. 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असं या गटाचं नाव ठरलं असून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल असं बंडखोर आमदारांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

SCROLL FOR NEXT