mla sunil shelke opposed mp shrirang barne candidate for maval lok sabha constituency saam tv
मुंबई/पुणे

Maval Politics: राजकारण तापलं; पार्थच्या प्रेमापाेटी मावळात बारणेंना विराेध, बाळा भेगडे कमळ फुलवतील भाजपला विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मावळ लोकसभ मतदारसंघात सभा हाेणार आहे. त्यापूर्वीच येथील राजकारण तापलं आहे.

दिलीप कांबळे

Maval News :

मावळ लोकसभा मतदारसंघात (maval lok sabha constituency) जागा वाटपापूर्वी भाजपने (bjp) दावा ठोकला आहे. तर दूसरीकडे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (mp shrirang barne) यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार (deputy cm ajit pawar) गटातील आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) यांनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. या रस्सीखेच वातावरणामुळे आगामी काळात मावळ लाेकसभा मतदारसंघ (loksabha election 2024) काेणाच्या पदरात पडताे याची उत्सकुता राजकीय वर्तुळात लागली आहे.  (Maharashtra News)

मावळ लोकसभा जागा वाटपाच्या आधीच भाजपने या जागेवर दावा ठोकत कंबर कसलीये. महायुतीच्या सरकारमध्ये एकत्र राज्याचा कारभार करत असलेले शिंदे गटातील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आहेत, मात्र तरी भाजपने देखील तयारी केल्याचं चित्र मावळात दिसून येतंय.

बाळा भेगडेंच्या केकची चर्चा

लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सध्या मावळात वाहू लागल्याने मावळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देहूरोड येथे भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त बनविलेल्या केकची चर्चा होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपमय रंगात तयार केलेल्या केकवर लाल दिव्यांची गाडी, कमळाचे फुल तर मध्यभागी भावी खासदार अशा आशयाची पाटी होती. दुसरीकडे मावळ तालुका प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी मावळचा खासदार आणि आमदार भारतीय जनता पार्टीचा असेल असे कार्यकर्त्यांना बाेलून दाखविले आहे.

बाळा भेगडे हेच खासदार : सर्मथक

महायुतीच्या सरकारमध्ये मावळ लोकसभा, शिवसेना शिंदे गट तर मावळ विधानसभा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असताना देखील भाजपचे राजकीय डावपेच सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र भाजपचे जबाबदार कार्यकर्ते यांचा उत्साह माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना खासदार बनविण्याचा प्रयत्नात आहे.

या प्रश्नावर उत्तर देताना बाळा भेगडेंनी मिश्किल शब्दांत उत्तर देताना या सर्व चर्चा मीडियावर रंगल्या असून महायुती जो निर्णय देतील तो निवडून येईल. कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात राम लल्लाच्या जय श्रीरामचा नारा देण्यात आला. यात मुस्लिम कार्यकर्ते जोमात दिसत होते.

पार्थ पवारांच्या प्रेमापाेटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेत सभा घेताहेत. एका अर्थाने ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराचा शुभारंभचं करतायेत. असं असलं तरी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेळकेंनी मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे.

अजित पवारांचे पुत्र पार्थ साठी शेळके हा आग्रह करतायेत, अशी चर्चा यानिमित्ताने रंगलीये. शेळके सुद्धा पार्थच्या चर्चांना स्पष्टपणे नाकारत नाहीत. "दादा म्हणतील तसं" असं म्हणत शेळके खासदार बारणेंना सूचक इशारा दिलाचे बाेलले जात आहे.

मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढणार ?

महायुती म्हणून फक्त राष्ट्रवादीनेच नैतिकता सांभाळायची का? बारणेंना उमेदवारी देऊन तुम्ही जनतेला गृहीत धरताय का? असे प्रश्न उपस्थित करत बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपने विचार करावा असं म्हणत शेळकेंनी बारणेंना उमेदवारी न देण्याचा इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मला भावी मुख्यमंत्री म्हणतात, पण...; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Uddhav Thackeray: तुम्ही मला संपवू शकत नाहीत; परभणीत उद्धव ठाकरे मोदी, शहांवर कडाडले

Raj Thackeray: नगरसेवक असतो का? महापालिकेच्या निवडणुकांवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Batami Magachi Batami : कुठून आलं,'बटेंगे तो कटेंगे'; नारा राजकारणात आला कसा? VIDEO

Kannapa: प्रभासचा लूक व्हायरल करणाऱ्याचा शोध घ्या; 'कन्नपा' चित्रपट निर्माते देणार लाखो रुपयांचे बक्षीस,काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT