Shivsena Action On MLA Santosh Banga Saam Tv
मुंबई/पुणे

Hingoli : शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी

MLA Santosh Bangar Latest News | संतोष बांगर हे मुंबईतून आपल्या मतदार संघात परतले होते आणि उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं सांगत ढसाढसा रडले होते.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उद्धव ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांची हकालपट्टी केली आहे. शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर बांगर हे मुंबईतून आपल्या मतदार संघात परतले आणि उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं सांगत ढसाढसा रडले होते, मात्र बहुमत चाचणीच्या एक दिवस आधीच ते पुन्हा शिंदे गटात गेले आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला होता, त्यानंतर आता पक्षाने बांगर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. (Santosh Bangar Latest News)

हे देखील पाहा -

शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या काही तासांपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झाले होते. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार ज्यावेळी गुवाहाटी येथे पोहोचले होते, तेव्हा आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक दिसले होत. त्यांनी या बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन देखील केले होते. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी दाखवलं होतं. मात्र ते अचानक शिंदे गटात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मराठवाड्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात जाऊन कोथळा काढू अशी धमकी दिल्याने आमदार बांगर हे चर्चेत आले होते, आमदार बांगर हे कायम ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होते मात्र , एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर त्यांनी देखील शेवटी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात एंट्री केली होती. यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT