Nandurbar : अक्कलकुवा तालुक्यात ८५ मिलीमीटर पावसाची नोंद; पूरामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Akkalkuwa Flood: मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवनावर परिणाम झाला आहे.
Nandurbar Akkalkuwa taluka receives 85 mm of rainfall
Nandurbar Akkalkuwa taluka receives 85 mm of rainfallदिनू गावित
Published On

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून काल सातपुडा अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. एकट्या अक्कलकुवा (Nandurbar) तालुक्यात जवळपास काल, रविवारी 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवनावर परिणाम झाला आहे. पूराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Flood In Akkalkuva, Nandurbar News)

हे देखील पाहा -

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या देव नदीच्या पुराच्या पाण्याने अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील आश्रम शाळेला वेढा दिला, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी धावपळ उडाली होती. आश्रम शाळेत उपस्थित 202 विद्यार्थ्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये पुराच्या पाण्याने (Flood Water) जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून ४० वर्षानंतर पूर्ण झालेल्या देहली मध्यम प्रकल्पात पहिल्याच पुराच्या पाण्यात जलमय स्थिती पाहायला मिळाली आहे. अनेक शेतांमध्ये व पुनर्वसंन न झालेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सरासरी ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे.

Nandurbar Akkalkuwa taluka receives 85 mm of rainfall
INS Vikrant: भारताची सागरी शक्ती वाढणार; आयएनएस विक्रांतची चौथी चाचणी यशस्वी

दरम्यान नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने घरगुती सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी आणि छोटे नाले भरून शेतांमध्ये जलमय परिस्थिती झाली असून वस्तींमध्ये पाणी शिरले आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या या गावातील नागरिकांना प्रशासनाने जलमय परिस्थितीचा आढावा घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com