INS Vikrant: भारताची सागरी शक्ती वाढणार; आयएनएस विक्रांतची चौथी चाचणी यशस्वी

INS Vikrant Marathi News: अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या युद्धनौकेवरील सर्व उपकरणे आणि यंत्रणांची चाचणी घेण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
ins vikrant 2022
ins vikrant 2022twitter/@indiannavy
Published on
ins vikrant cost
ins vikrant costtwitter/@indiannavy

स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant 2022) चौथ्या टप्प्यातील सर्व सागरी चाचण्या काल रविवारी यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. यादरम्यान, ऑन बोर्ड एव्हिएशन सुविधेसह सर्व उपकरणांची विविध परिस्थिती आणि आव्हानांनुसार चाचणी घेण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

ins vikrant photo
ins vikrant phototwitter/@indiannavy

भारतीय नौदलाने सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस विमानवाहू जहाजाची (Aircraft Carrier) डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य ठेवले जात आहे, त्यानंतर आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ऑगस्ट 2022 मध्ये ते कार्यान्वित होईल. आयएनएस विक्रांतला भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांनी संयुक्तपणे भारतातच डिझाइन केले आणि तयार केले आहे.

ins vikrant sea trials
ins vikrant sea trialstwitter/@indiannavy

कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या 2000 कर्मचाऱ्यांना विक्रांत ही विमानवाहू नौका तयार करण्याची संधी मिळाली आणि त्याच्याशी संबंधित विविध कंपन्यांमधील 12,000 लोकांना काम मिळाले. त्यामुळे हे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे हे एक उदाहरण मानले जात आहे.

ins vikrant latest news
ins vikrant latest newstwitter/@indiannavy

विक्रांत या एअर क्राफ्टच्या पहिल्या सागरी चाचण्या ऑगस्ट 2021 मध्ये यशस्वीपणे पूर्ण झाल्या. यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दुसरी आणि जानेवारी 2022 मध्ये तिसरी अशा तीन समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या, आता रविवारी १० जुलै २०२२ ला चौथी चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. आयएनएस विक्रांत कार्यान्वीत झाल्यानंतर भारतीय हवाई दलाचीही ताकद आणखी वाढणार आहे.

new ins vikrant
new ins vikranttwitter/@indiannavy

विक्रांतमध्ये 14 डेक म्हणजेच 14 मजले आहेत. त्याचे वजन 40000 टन असून त्यावर 30 ते 40 विमाने बसवता येतात. त्याच्या लांबीबद्दल बोलायचे तर ते 262 मीटर लांब आणि 59 मीटर उंच आहे.

indigenous aircraft carrier ins vikrant
indigenous aircraft carrier ins vikranttwitter/@indiannavy

विक्रांत भारतीय नौदलात रुजू झाल्यानंतर भारतीय नौदलाकडे दोन विमानवाहू युद्धनौका असतील. सध्या भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रमादित्य ही देशातील एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे.

ins vikrant commissioned
ins vikrant commissionedtwitter/@indiannavy

37,500 टन वजनाची ही विक्रांत युद्धनौका तयार करणारा भारत हा अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्ससह काही निवडक देशांमध्ये सामील झाली आहे. ज्यांच्याकडे अशा युद्धनौका तयार करण्याची क्षमता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com