rohit pawar and bhagat singh koshyari  saam tv
मुंबई/पुणे

राज्यपालांच्या शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर रोहित पवार संतापले; म्हणाले, 'पात्रता नसलेल्या...'

पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही, अशा शब्दात रोहित पवारांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Rohit Pawar News : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय-सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही, अशा शब्दात रोहित पवारांनी राज्यपालांवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यांमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे.

'राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT