MNS : डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण (MLA Ravidnra Chavan) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने सध्या डोंबिवली आणि ग्रामीण भागात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे वाटून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद मिळाल्याने आम्ही आज दिवाळी साजरी करत आहोत आणि जर मनसे (mns) आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांना मंत्रीपद मिळाल्यास ग्रामीण दसरा साजरा करू असे भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी नमूद केले. (dombivli latest marathi news)
राज्यातील सत्ता संघर्षाच्या कालखंडात मंत्री मंडळाचा विस्तार लांबला होता. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात मंत्री मंडळाचा विस्तार (Maharashtra mantrimandal vistar 2022) झाला आहे. या मंत्रीमंडळात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे डोंबिवली आणि ग्रामीण भागात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला गेला.
आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाला असल्याने सध्या ग्रामीण भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद मिळाल्याने आम्ही आज दिवाळी साजरी करत आहोत आणि जर मनसे आमदार राजू पाटील यांना मंत्री पद मिळाल्यास ग्रामीण दसरा साजरा करू अशी प्रतिक्रिया भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिली.
मंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
२००५ मध्ये भाजपकडून पहिल्याच टर्ममध्ये नगरसेवक.
त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये २००७ मध्ये स्थायी समिती सभापती.
नगरसेवक असतानाच २००९ मध्ये आमदारकी लढवत मनसेच्या राजेश कदम यांचा पराभव केला.
तेव्हापासून आजतागायत डोंबिवली मधून सतत ३ वेळा आमदार.
देवेंद फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पद कार्यकाळात रायगडचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री काम पाहिले.
देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून ख्याती.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.