Uddhav Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

MLA Disqualification Result: आजचा निकाल कदाचित ठाकरेंच्या विरुद्ध येईल, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांचा दावा

16 MLA Disqualification Case: आजचा दिवस राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो. आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचे वाचन होईल.

साम टिव्ही ब्युरो

Vijay Wadettiwar On MLA Disqualification Result:

आजचा दिवस राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो. आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचे वाचन होईल. याआधीच राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले आहेत की, आजचा निकाल कदाचित ठाकरे यांच्या विरोधात येऊ शकतो. त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर याना लक्ष्य करत म्हटलं आहे की, ''निकाल वर्षावरच्या भेटीच्या आधीच ठरला आहे. त्यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचायची आहे. त्यासाठी एवढा विलंब केला.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार अपात्रता निकालाची मॅच फिक्स

आजच्या निकालावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही संशय व्यक्त केला आहे. आज पत्रकार परिषद घेत ते म्हणाले आहेर की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला महाराष्ट्रात रोड शो (नाशिकमध्ये) करणार आहे. तर आमदार अपात्रतेचा निकाल असल्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जाणार आहे. याचाच अर्थ असा आहे की, दोघांनाही मॅच फिक्सिंगबाबत पूर्ण माहिती आहे.'' (Latest Marathi News)

राऊत म्हणाले आहते की, "दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटना बाह्य सरकार काम करत असून जे निर्णय घेतले जात आहेत, त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राची संविधान पायदळी तुडवला जात आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा विधानसभेचे यांनी सुनावणी देण्यास चालढकल केली."

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, निकाल काहीही असुद्या आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

SCROLL FOR NEXT