Breaking News: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? मुख्यमंत्र्यांचं शिवसंकल्प अभियान रद्द; पडद्यामागे काय घडतंय?

Maharashtra Political News: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. त्याआधी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News,
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News, saam tv
Published On

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. त्याआधी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाचा पुढचा दौरा रद्द केला आहे.

हिंगोलीनंतर आज धाराशिव येथे मुख्यमंत्री शिंदेंची सभा होणार होती. मात्र, आता ही सभा रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर आज सकाळी १० वाजता राज्यमंत्रीमंडळाची महत्वाची बैठक देखील बोलावण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News,
Maharashtra Political News : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत काँग्रेस-ठाकरे गट-शरद पवार गटात चर्चा; बैठकीत नेमकं काय झालं?

या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मा दुसरीकडे शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच मनसे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये भेट झाल्याने राज्यात पुन्हा काहीतरी मोठं घडणार, राजकीय भूकंप येणार, अशा उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मात्र, ही भेट राजकीय नसून शिवाजी पार्क मैदानाबाबतच्या विषयावर होती, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे आमच्याकडे विधानसभेत बहुमत असल्याने निकाल आमच्याच बाजूने लागणार, असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून केला जात आहे. (Latest Marathi News)

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या बाजूने निकाल लागावा यासाठी भल्यापहाटे देवाची पूजा देखील केली आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये मंगळवारी रात्री एक महत्वाची बैठक पार पडली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचं कळतंय. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार असल्याने राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळू नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे.

याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, आज दादर येथील शिवसेना भवनासोबत ठिकठिकाणी शिवसेना कार्यालये आणि शाखांबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News,
Pankaja Munde: पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला बँकेची नोटीस; लवकरच लिलाव होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com