Suprem court, MLA Disqualification Case Saam TV
मुंबई/पुणे

MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं; सुनावणीत आज काय झालं?

Supreme Court Update on Maharashtra MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सल्ला द्यायला हवा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ शकत नाही.

प्रविण वाकचौरे

Supreme Court on Maharashtra MLA Disqualification Case:

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबच्या सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. प्रकरणाच्या सुनावणीला होत असलेल्या दिरंगाईबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना कडक शब्दांत खडसावलं आहे.

सरन्यायाधीश आज चिडलेलेले पाहायला मिळाले. निकाल लवकर द्या, नाहीतर तोपर्यंत निवडणूक होतील, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटल्याची माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. तसेच अध्यक्षांना समजवा अशी सूचनाही महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

आमदार अपात्र प्रकरणात अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही, याबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही १४ जुलैला नोटीस काढली, त्यानंतर २३ सप्टेंबरमध्ये आदेश काढला. पण विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत कोणतेच निर्णय घेतले नाहीत, यावरुन  सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सल्ला द्यायला हवा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ शकत नाही. त्यांच्या वेळापत्रकामुळे सुनावणीला अनिश्चित काळ विलंब झाला नाही पाहिजे. निवडणुकांआधी या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे. जूनपासून या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत आता सुनावणी व्हायला हवी, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.

विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक अमान्य

विधानसभा अध्यक्षांनी तयार केलेलं वेळापत्रक सरन्यायाधीशांना अमान्य केलं आहे. तसेच सुधारित वेळापत्रक मंगळवारपर्यंत द्या, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

सुधारित वेळापत्रक सादर केलं नाही तर नाईलाजास्तव टाईमलाईन आखून द्यावी लागेल. ही टाईमलाईन २ महिन्यांची असू शकते आणि त्यात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेणे बंधनकारक असेल, असं कोर्टाने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT