Abdul Sattar  Saam TV
मुंबई/पुणे

Abdul Sattar : आमदार अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट? चर्चांना उधाण

आमदार अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा (Eknath Shinde अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. दरम्यान, एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याची माहिती आहे. (Mla Abdul Sattar Latest News)

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमधील घोटाळ्यात आमदार अब्दुल सत्तार यांचेही नाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन सत्तार हे सोमवारी दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. शिवाय विरोधकांनीही त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपदही मिळणार की नाही? अशी चर्चा जोरदार सुरू आहे.

दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला रवाना झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आदेश देतात त्यानुसार मी माध्यमांना बोलतो असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

सत्तारांच्या अडचणी वाढणार?

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुला-मुलीने टीईटी प्रमाणपत्राचा वापर करुन सेवेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना अशाप्रकारे अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याने त्यांचा मंत्रिपदाच्या निवडीवर काय परिणाम होणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

शिवाय विरोधकांनीही सत्तारांना धारेवर धरत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. अब्दुल सत्तार यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरापसून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या सत्तारांबद्दल काय निर्णय घेतला जाणार हे पहावे लागणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऑलिंपिक महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल

Sonali Kulkarni Photos: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सुंदर लूक, फोटोंनी केलं घायाळ

Diana Penty: डायना पेंटीचे १०० वर्षे जुने घर पाहून नेटकरी थक्क, पाहा सुंदर फोटो

Shocking News : नवी मुंबई हादरली! हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या तरुणीने इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर पुन्हा संकट; सलग ३ दिवस पाऊस कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना फटका बसणार?

SCROLL FOR NEXT