jitendra awhad  saam tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad: ...तर सरकारने मला फाशी दिली तरी मला मान्य, 'हर हर महादेव' चित्रपटाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध कायम

शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही सहन करणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे  (NCP)  आमदार जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामिनावर सुटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अटक ते सुटका असा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. माझ्या अटकेबाबत मी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत होते, असं जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad)  यांनी म्हटलंय. तसेच हर हर महादेव चित्रपटाला आपला विरोध का आहे, हे त्यांनी एक व्हिडीओ दाखवून सांगितलं.

माझ्या अटकेमागे कुणाचा हात आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्ही काहीही करु शकतो हे दाखवण्यासाठी माझी अटक होती. विवियाना मॉलमध्ये झालेल्या घटनेत प्रेक्षकाला मी मारहाण केली नाही. त्या प्रेक्षकानेही माध्यमांसमोर देखील हे मान्य केलं आहे. मात्र कुणी तक्रारदार भेटत नसल्याने मॉलचे अधिकारी आणि सिनेपॉलिसच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत तक्रार करण्यात आली.

अटकेबाबतही नियमबाह्य कारवाई करण्यात आली. मात्र शिवरायांसाठी मला सरकारने फाशी जरी दिली मला ती मान्य आहे. शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही सहन करणार नाही. अशा चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही इतिहासाचं विकृतीकरण करत आहात, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

'हर हर महादेव' एवढा विकृत सिनेमा नाही. चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विरोध केला हा आमचा गुन्हा आहे का? असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला.

व्हिडीओ दाखवल्यानंतर, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला हर हर महादेव चित्रपटात दाखल्याप्रमाणे मारलं होत का? शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई झाली होती का? असे प्रश्न त्यांनी विचारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat-Anushka: विराट आणि अनुष्काचे अनसीन रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

SCROLL FOR NEXT