Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

Jitendra Awhad: 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.
JItendra Awhad
JItendra Awhadsaam tv

ठाणे : राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना अटीशर्थींसह 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने काही अटी जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad)  यांना घातल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांना सहकार्य करण्याची महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे शेकडो कार्यकर्ते न्यायालयाबाहेर जमले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या. राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

JItendra Awhad
Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाडांना ठाणे कोर्टात हजर केलं; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाणप्रकरणी काल जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांना अटक केली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आज न्यायालयाने 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

JItendra Awhad
Shivsena : किर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाची कारवाई; पक्षाच्या नेते पदावरून केली हकालपट्टी

काय आहे प्रकरण?

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राज्यभरातील काही संघटनांनी विरोध केला आहे. हर हर महादेव या चित्रपटाचे शो राज्यभरातील चित्रपटांमध्ये दाखवू नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी या शो बंद पाडले होते.

ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली होती. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ठाण्यातील वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com