देवेंद्र फडणवीसांच्या टीकेने 2024 मध्येही चमत्कार घडवून आणू - नवाब मलिक  Saam Tv
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेने 2024 मध्येही चमत्कार घडवून आणू - नवाब मलिक

लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत. देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हे देखील पहा-

जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होतात त्यावेळी १९८४ साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे. ही लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

पवारसाहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही उलट पवारसाहेब देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदीसरकार सत्तेबाहेर जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT