Mira Road Killing Case Saam Tv
मुंबई/पुणे

Mira Road Killing Case: सरस्वती माझ्या मुलीसारखी; आरोपी सानेचे 4 धक्कादायक खुलासे, पोलीसही चक्रावले

Mira Road Police: याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Priya More

Mira Road News: मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय मनोज सानेने (Accused Manoj Sane) प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Nayanagar Police Station) आरोपीला अटक केली असून त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हे ऐकल्यानंतर पोलीस देखील चक्रावले आहेत.

आरोपी मनोज साने याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, 'सरस्वती माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत मी कधीही शारीरिक संबंध ठेवले नव्हते. सरस्वतीने 3 जून रोजी आत्महत्या केली होती. आपल्यावर गुन्हा दाखल होईल आणि पोलीस अटक करतील या भीतीने मी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.'

तसंच आरोपीने चौकशीदरम्यान असा देखील दावा केला की, '2008 मध्ये मी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे मला कळाले होते. तेव्हापासून माझ्यावर औषधोपचार सुरु आहेत.' आरोपी मनोज सानेने याप्रकरणी केलेला दावा ऐकून पोलीस देखील चक्रावले आहेत. या प्रकरणाचा ते कसून तपास करत आहेत.

मीरा रोडच्या गीतानगरमध्ये राहणाऱ्या 56 वर्षांच्या मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर 32 वर्षीय सरस्वती वैद्यची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीने सरस्वतीच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक ट्री कटरच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे केले होते. त्यानंतर आरोपीने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले आणि कुत्र्यांना खायला घातले. तर काही तुकडे त्याने मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक केले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील त्यावेळी त्यांना आरोपी मनोज सानेच्या घरातील बेडरुम आणि स्वयंपाक घरामध्ये बादल्या, टब, कुकर आणि इतर भांड्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे दिसले होते. हे पाहून पोलिसांनाही हादरा बसला होता. सानेच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना तक्रार केली त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आले होते.

याप्रकरणी मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी आरोपी मनोज सानेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला गुरुवारी ठाण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मनोज सानेची 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT