Mira Road Violence over pigeon feeding Saam Tv News
मुंबई/पुणे

कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव, महिलेला लोखंडी रॉडनं काळंनिळं होईपर्यंत मारलं; गळाही आवळला

Mira Road Violence: मीरा रोडमध्ये कबुतरांना दाणे टाकण्यावरून वृद्ध व त्यांच्या मुलीवर हल्ला. लोखंडी रॉडने मारहाण, गळा दाबल्याचा आरोप. आशा व्यास आणि इतर ३ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • मीरा रोडमध्ये कबुतरांना दाणे टाकण्यावरून वृद्ध व त्यांच्या मुलीवर हल्ला

  • लोखंडी रॉडने मारहाण, गळा दाबल्याचा आरोप

  • आशा व्यास आणि इतर ३ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या कबुतरखाना आदेशांनंतर वादाला उधाण

मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरखान्यांविरोधात कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुबंई महानगरपालिकेनं काही कबुतरखाने ताडपत्रीनं झाकले आहेत. यावर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कबुतरांची विष्ठा, पिसं यामुळे गंभीर आजारांचा त्रास होऊ शकतो. दरम्यान, मीरारोडमध्ये कबुतरांना दाणे टाकण्यावरून झालेल्या वादातून वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्या लेकीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महेंद्र पटेल (वय वर्ष ६९) हे मीरा रोडच्या ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन ३० परिसरातील रहिवासी आहे. रविवारी सकाळी ते दूध आणण्याकरीता गेले होते. यावेळी आशा व्यास या महिला कबुतरांना दाणे टाकत होते. महेंद्र यांनी त्यांना कबुतरांना दाणे टाकू नका असे सांगितलं. महिलेला याचा राग आला. महिलेनं शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. हा सगळा गोंधळ एकून महेंद्र यांची मुलगी वडिलांजवळ गेली.

वडिलांना का शिवीगाळ करता? अशी विचारणा केली असता, आशा या महिलेला प्रेमललाही शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. गोंधळ पाहून आशा व्यास यांच्या इमारतीत राहणारा सोमेश खाली उतरला. त्याच्यासह २ अनोळखी लोकही सोबत होते. त्यांनी मिळून प्रेमल यांना लोखंडी रॉडनं मारहाण करण्यास सुरूवात केली.

तर, उपस्थित असलेल्या एकानं त्यांचा गळा दाबला. यानंतर आशा आणि त्यांच्या वडिलांनी काशीमीर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी आशा व्यास, सोमेश अग्निहोत्री तसेच इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: आशियातील सर्वात मोठे गाव भारतात कोणत्या भागात आहे?

Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई, एकाच पदासाठी दोघांकडून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती

Amruta Khanvilkar : अमृताने पटकावला पहिला राज्य चित्रपट पुरस्कार,'चंद्रमुखी'चं सर्वत्र होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT