Mira Bhayandar Saam TV
मुंबई/पुणे

Mira Bhayandar to Bangladesh Bus : मीरा भाईंदर ते बांगलादेश बससेवा सुरू; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

Mira Bhayandar News : नव्या नावामुळे या गावाने स्वत:चे खरे नाव गमावल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Mira Bhayandar News : भाईंदर पश्चिम येथील उत्तन-चौक भागात चक्क बांगलादेश नावाचा एक परिसर आहे. या ठिकाणी पूर्वी परराज्यातून आलेले नागरिक विस्थापित म्हणून राहत असल्यामुळे या परिसराला बांगलादेश असं टोपण नाव पडले होते.

मात्र आता याच नावाचा उल्लेख आधार कार्ड, मालमत्ता देयकात आणि चक्क परिवहन बस थांब्यावर करण्यात येत आहे. अशारितीने या गावाला अधिकृतरित्या बांगलादेश नाव दिल्याने नव्या वादास सुरुवात झाली आहे. नव्या नावामुळे या गावाने स्वत:चे खरे नाव गमावल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.

भाईंदर पश्चिम उत्तन हा समुद्र किनाऱ्यालगतचा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी मच्छिमार नागरिकांची गावे अधिक प्रमाणात आहे. पूर्वीपासूनच या किनाऱ्यावर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आर्थिक संपन्नता आली होती. त्यामुळेच या भागात बाजार आणि नवनवीन सुखसुविधाची उभारणी जलद गतीने होत गेली. म्हणून हाताला काही कामधंदा मिळण्याच्या हेतूने अनेक नागरिक याठिकाणी येऊ लागले. (Latest Marathi News)

यात परराज्यातून आलेल्या लोकांचा समावेशही होता. काळानुसार हे लोक उत्तन येथील चौक जवळ असलेल्या मोकळ्या भागात छोटी घरं करून राहू लागले. दरम्यान या काळात इंदिरा गांधीच्या पुढाकारामुळे 'बांगलादेश' राज्याची निर्मिती झाली होती. त्यामुळे बांगलादेश हा शब्द तेव्हा प्रचलित झाल्यामुळे स्थानिक मच्छिमारांनी या चौकातील वस्तीला बांगलादेश असे टोपण नाव दिले होते.

दुर्दैवाने तेव्हापासून याच नावाची ओळख या परिसराला मिळाली होती. मात्र आता हे नाव अधिकृतरित्या या परिसराला देण्यात आल्याचे समोर आले आहे. कारण या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्डवर तसेच स्थानिक मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून या लोकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता बिलाचे देयकात पत्त्यामध्ये 'बांगलादेश' असाच उल्लेख करण्यात आला आहे. (Mumbai News)

इतकेच नवे तर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या परिवहन सेवेच्या बस थांब्यावर देखील बांगलादेश असेच लिहण्यात आले आहे. मुळ भारतीय असताना देखील लोकांच्या उच्चारामध्ये बांगलादेशी अशी हाक मारली जात असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन हे नाव बदलावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT