Mira Bhayandar Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mira Bhayandar Accident: भाईंदरमध्ये भीषण अपघात, क्रेनने महिलेला चिरडले

Women Died After Crane Crashed: भाईंदर पूर्वेला क्रेनने महिलेला चिरडल्याची घटना घडली. भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केअर हॉस्पिटल सिग्नलजवळ ही घटना घडली.

Priya More

मिरा भाईंदरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव क्रेनने महिलेला चिरडले. या अपघातामध्ये महिलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की महिलाच्या शरीराचे तुकडे झाले. या अपघातामध्ये रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेला क्रेनने महिलेला चिरडल्याची घटना घडली. भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केअर हॉस्पिटल सिग्नलजवळ ही घटना घडली. एका वयोवृद्ध महिलेला क्रेनने चिरडले. या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले.

हा अपघात झाल्यानंतर क्रेन आणि महिलेचा मृतदेह त्याच ठिकाणी पडून आहे. नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेन चालकाला ताब्यात घेतले. या अपघातामध्ये घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सिग्नलवर वाहतूक पोलिस देखील उपस्थित नाहीत. या अपघाताचा तपास नवघर पोलिसांकडून सुरू आहे. ही महिला कोण होती याची ओळख पटवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

Asia Cup 2025: टीम इंडियातील किती खेळाडूंचे लग्न झाले तर किती अविवाहित?

Manoj Jarange: गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मुंबईत मनोज जरांगे गरजले

SCROLL FOR NEXT