Accident News : चालकाला डुलकी लागली, कार दुभाजकावरुन उलटी झाली, ५ डॉक्टरांचा मृत्यू

Accident News : कार चालवताना चालकाला डुलकी लागली, त्यामुळे भीषण अपघात झालाय. पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झालाय. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलेय.
Accident
AccidentSaam tv
Published On

Uttar Pradesh Accident News : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे भरधाव वेगात असणारी कार दुभाजकावर आदळली. त्यामुळे कार जागेवरच उलटली. या अपघातातपाच डॉक्टरांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळातच पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेत. एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसही तैनात आहेत.

अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झालाय. एक्स्प्रेस वेवर चालकाचा डोळा लागल्यामुळे भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूला पलटी झाली. या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आलेय. जखमीवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मृतपैकी चार जणांची ओळख पटली आहे, एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

39 वर्षीय डॉ. जयवीर सिंग, 29 वर्षीय डॉ. अनिरुद्ध वर्मा, 40 वर्षीयडॉ. संतोष कुमार मौर्य, डॉ. अरुण कुमार, डॉ. नरदेव यांच्यासह सहा जण मंगळवारी संध्याकाळी लखनऊमध्ये मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी स्कॉर्पिओमध्ये गेले होते.

सहा डॉक्टर स्कॉर्पिओने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सैफई मेडिकल कॉलेजकडे निघाले होते. आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर सिक्रोरी गावाजवळ स्कॉर्पिओ नियंत्रणाबाहेर गेली. कारचा वेग खूप होता, त्यामुळे दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला पलटी झाली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यामध्ये डॉक्टरांचा मृत्यू झालाय.

अपघाताच्या ठिकाणीच पाच डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. डॉ. जयवीर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी नातेवाईक आणि सैफई मेडिकल कॉलेज प्रशासनाला माहिती दिली आहे. नातेवाईक आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com