Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Sikandar Shaikh Connection With Papla Gurjar Gang: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. या घटनेमुळे राज्याच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकांदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक तपासातून समोर आले आहे. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस तपासतून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांनी बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडवकवले जात आहे असे त्यांनी म्हटले आहे. सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 मध्ये माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सिकंदर शेख हा चर्चेत आला होता. सिकंदरच्या अटकेनंतर राज्याच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली असून याप्रकरणी लवकरच अधिक माहिती समोर येईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com