Mumbai Kashimira Hit And Run Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : मीरा भाईंदरमध्ये हिट अँड रनचा थरार! मद्यधुंद चालकाचा हैदोस, धडकीत वाहनांचा चक्काचूर

Mumbai Kashimira Hit And Run Accident : काशिमिरा परिसरात ड्रिंक अँड ड्राईव्हची एक घटना समोर आली आहे. अपघातामध्ये दोन वाहनांची टक्कर झाली. अल्टो कारमध्ये बसलेल्या तरुणाने मद्यप्राशन केले होते.

Yash Shirke

मनोज तांबे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मीरा भाईंदरच्या काशिमिरा परिसरामध्ये हिट अँड रनची थरारक घटना घडली आहे. भीषण अपघातामध्ये दोन चारचाकी वाहनांची टक्कर झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अल्टो कारमध्ये असलेला तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (२२ जून) मध्यरात्री एकच्या सुमारास दहिसरच्या दिशेकडून येणाऱ्या अल्टो कार भर वेगाने निघाली होती. या कारने एका चारचाकी कारला जोरदार धडक मारली. अल्टो कारचा चालक तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह करत त्याने एका वाहनाला धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, अल्टो कारची दोन्ही चाके बाहेर निघाली. ही चाके पन्नास मीटरपेक्षा अधिक लांब फेकली गेली. याशिवाय दोन्ही चारचाकी वाहनांचा चक्काचूर देखील झाला. या भीषण अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरारोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्सोवा पुलावर तेलवाहू टँकर खाडीत पडला!

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने निघालेला तेलाने भरलेला टँकर विरारजवळ खाडीत कोसळला. या अपघातानंतर सुरू करण्यात आलेल्या बचावकार्यादरम्यान एका व्यक्तीचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला आहे. यात आणखी कुणी अडकले आहे का यासाठी शोधकार्य सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : मोठी राजकीय घडामोड! बड्या नेत्याने पक्षातून केली मुलीची हकालपट्टी

Manoj jarange patil protest live updates: मंचरमध्ये एकमेकाला लाडू भरवून मराठा आंदोलकांनी साजरा केला आनंदोत्सव

Frequent Urination: आरोग्याचा इशारा! ही सात लक्षणे टाळू नका, योग्य तपासणी लगेचच करा

Maratha Reservation GR: मराठा आरक्षण GR चा राज्यात फायदा? पाहा मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? VIDEO

Horoscope Wednesday : ४ राशींसाठी बुधवार जाणार खास, वाचा संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT