Bhayandar Accident : वर्सोवा पुलावर भीषण दुर्घटना! तेलवाहू टँकर खाडीत कोसळला; एकाचा मृत्यू

Oil Tanker Collapsed at Versova Bridge: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारहून ठाण्याच्या दिशेने निघालेला ऑइलने भरलेला टँकर खाडीत कोसळला. बचावकार्यादरम्यान खाडीतून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
Oil Tanker Collapsed at Versova Bridge
Oil Tanker Collapsed at Versova Bridgex
Published On

मनोज तांबे, साम टीव्ही, प्रतिनिधी

भाईंदर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरुन ऑइल वाहतूक करणारा ट्रँकर खाडीत कोसळला. ही घटना सोमवार (२३ जून रोजी) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन विरार येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरुन ऑइलने भरलेला टँकर निघाला होता. या टँकरची सकाळी जुन्या वर्सोवा पुलावर पोहोताच रस्त्यावर असलेल्या दुसऱ्या वाहनाला धडक झाली. त्यानंतर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून टँकर खाडीच्या पाण्यात पडला.

Oil Tanker Collapsed at Versova Bridge
Air India च्या विमानात चढण्यासाठी पठ्ठ्या चक्क मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावला, नंतर जे घडलं त्यानं...

टँकर खाडीमध्ये कोसळल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच काशिगाव पोलीस व वाहतूक विभाग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लगेचच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले.

Oil Tanker Collapsed at Versova Bridge
Sanjay Raut : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच एकनाथ शिंदेंकडे दिलेला, पण...; शिंदेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

आतापर्यंत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला आहे. अन्य कोणी व्यक्ती त्याच अडकला आहे का याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय हा ऑइल वाहतूक घेऊन जाणारा टँकर बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरु आहेत. वर्सोवा पुलावर झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Oil Tanker Collapsed at Versova Bridge
Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com