Pocso Case Shocks Mira-bhayandar: Woman And Child Welfare Chairperson’s Brother Arrested saam tv
मुंबई/पुणे

Mira-Bhayandar: कारमध्ये डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; महिला बालकल्याण समिती सभापतीच्या सख्खा भावाला अटक

Mira-Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींच्या भावाला 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. यावरून सभापतीच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली जातेय

Bharat Jadhav

  • महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांच्या भावाला पोक्सो कायद्यांतर्गत अटक.

  • लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या राजकारणात खळबळ.

  • सभापतींनी आरोपीला संरक्षण दिल्याचा विरोधकांचा आरोप.

मनोज तांबे, साम प्रतिनिधी

मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापतीच्या भावाला लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायदा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. सभापती अनिता पाटील यांच्या सख्ख्या भावाला अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सभापती अनिता पाटील यांनी आरोपीला संरक्षण देण्याचा व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली जातेय. या मागणीसाठी बुधवारी पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व पेणकर पाडा ग्रामस्थांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ राजेश चव्हाण याच्यावर अल्पवयीन मुलीवर अनेक वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आता त्याप्रकणी त्याला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

५० वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीला कारमध्ये डांबून आणि गोराईतील हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला होता. यासह आरोपी राजेश चव्हाणने पीडितेसह तिच्या आईलाही जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपीवर यापूर्वी देखील वीज चोरी आणि पत्रकारावर हल्ला केल्याचेही गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान अनिता पाटील यांनी हे गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पदाचा प्रभाव वापरून पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाल्याचाही आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार अनिता पाटील यांनी गमावला असून महापौरांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पालिका परिसरात घोषणाबाजी करण्यात आली तसेच निवेदनही सादर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उमरखेडमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ

Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Radish benefits: 90 दिवस रोज खा 1 मुळा; शरीराला मिळणारे फरक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Lalbaug Raja Visarjan : "पुढच्या वर्षी लवकर या" २४ तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

SCROLL FOR NEXT