मुंबई, ता. १७ ऑगस्ट २०२४
राज्यातील महायुती सरकार गुंडांना पोसत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. अशातच मीरा भाईंदरमधील एका कुख्यात महिला गुंडांच्या वाढदिवसाला चक्क आजी- माजी आमदार अन् स्थानिक नेत्यांनी हजेरी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या जंगी बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी (१५, ऑगस्ट) मीरा- भाईंदरमधील कुख्यात महिला गुंड गुलशन पटेल उर्फ आप्पाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गुलशन पटेल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे या वाढदिवसाला स्थानिक आमदार गीता जैन , माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
मीरा भाईंदर परिसरामध्ये गुलशन पटेलची मोठी दहशत आहे. तिच्यावर अपहरण, मारहाण, धमकावून जमीन बळकावणे, अवैध शस्त्र वापरणे असे गंभीर स्वरुपाचे ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अशा कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाला नेत्यांनी हजेरी लावल्याने परिसरामध्ये उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
राज्यात एकीकडे खून, मारामाऱ्या, जीवघेण्या हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. अशातच आता गुंडांच्या बर्थडेला हजेरी लाऊन लोकप्रतिनिधी त्यांना बळ देत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोही आमदार गिता जैन यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे गुंडांना नेत्यांचा वरदहस्त आहे का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.