Supriya Sule News: कार्यक्रमाला न आल्यास 'लाडक्या बहिणीं'चे अर्ज रद्द होणार? 'त्या' मेसेजवरुन सुप्रिया सुळे संतापल्या; राज्य सरकारला दिलं आव्हान!

Supriya Sule On Ladki Bahin Yojana: "हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच," असे थेट आव्हान सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महायुती सरकारला दिले आहे.
Supriya Sule News: 'कार्यक्रमाला न आल्यास 'लाडक्या बहिणीं'चे अर्ज रद्द होणार'? त्या मेसेजवरुन सुप्रिया सुळे संतापल्या; राज्य सरकारला दिलं आव्हान!
Supriya Sule On Ladki Bahin Yojana:Saamtv
Published On

पुण्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. अशातच लाभार्थी महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास अर्ज बाद होईल अशा धमकीचे मेसेज आल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या संदर्भातील त्यांचे ट्वीट सध्या व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

काय आहे सुप्रिया सुळेंचे ट्वीट?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार. अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं! असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

महायुतीवर संतापल्या!

तसेच "बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच," असे थेट आव्हानही त्यांनी राज्यातील महायुती सरकारला दिले आहे. या व्हायरल मेसेजवरुन आता राज्य सरकार अन् विरोधकांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे.

Supriya Sule News: 'कार्यक्रमाला न आल्यास 'लाडक्या बहिणीं'चे अर्ज रद्द होणार'? त्या मेसेजवरुन सुप्रिया सुळे संतापल्या; राज्य सरकारला दिलं आव्हान!
Congress Rally Mumbai: मोठी बातमी! राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवर वाहतूक पोलिसांचा आक्षेप, नेमकं कारण काय?

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे approved मेसेज आला आहे, त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे.

यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे सर्वांनी येणे आवश्यक आहे, ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल.

Supriya Sule News: 'कार्यक्रमाला न आल्यास 'लाडक्या बहिणीं'चे अर्ज रद्द होणार'? त्या मेसेजवरुन सुप्रिया सुळे संतापल्या; राज्य सरकारला दिलं आव्हान!
Pune News: पुण्यात लेझर बीम लाइटवर बंदी, दहीहंडीपासून अंमलबजावणी; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com