Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’चे पैसे चक्क भावाच्या खात्यात, ना अर्ज, ना कागदपत्रं तरीही योजनेचा लाभ

Ladaki Bahin Yojana Update : यवतमाळच्या आर्णीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा झाले आहेत. या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरीही पैसे जमा झालेत.
Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin YojanaSaam Digital
Published On

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. यवतमाळच्या आर्णीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. बहिणीसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका भावाच्या खात्यात जमा झालेत. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरीही पैसे जमा झालेत...कुठे घडलाय हा प्रकार ? पाहूया एक रिपोर्ट...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सुरु झालेल्या लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळू लागले आहेत. रक्षाबंधनापूर्वी सरकारनं गिफ्ट दिल्यानं महिला वर्गात आनंद आहे. यवतमाळमध्ये मात्र या योजनेचा भोंगळ कारभार समोर आलाय. ‘लाडक्या बहिणी’चे पैसे चक्क एका बेरोजगार तरुणाच्या खात्यात जमा झालेत. म्हणजेच ‘लाडक्या बहिणी’चे पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा झालेत. नेमकं काय घडलं ते पाहूया...

या योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झालेत. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यावर जाफर शेखलाही आश्चर्य वाटलं. अनेक महिलांनी गर्दीत तासन तास उभं राहून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेत. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरु होती.

Ladaki Bahin Yojana
Flight Ticket Price : सणासुदीच्या काळात मुंबईतून विमान प्रवास प्रचंड महागणार; कोणत्या मार्गांवर किती टक्के तिकिट वाढ? वाचा सविस्तर

मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही. पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. त्यामुळे मोठा गाजावाजा झालेल्या या योजनेची अंमलबजावणीही पारदर्शकपणे व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

Ladaki Bahin Yojana
Maharashtra Assembly Election : 'करवीर'वरून महायुतीत जुंपली; विनय कोरे, चंद्रदीप नरकेनेंही ठोकला शड्डू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com