Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Latest News : संतापजनक! अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडूनच लैंगिक अत्याचार; VIDEOच्या मागणीवरुन ६ वर्षांचं बिंग फुटलं

Mumbai Crime News : आरोपी पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. यावर मुलीने आक्षेप घेतला. यावरुन संतापलेल्या बापाने तिला मारहाण केली.

प्रविण वाकचौरे

Mumbai Crime News :

मुंबईतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील सहा वर्षांपासून हा नराधम बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. मुलीच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलीच्या पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील 2017 पासून तिचा विनयभंग करत होते. मात्र भीतीपोटी तिने लैंगिक छळाची माहिती कोणालाही दिली नव्हती. सोमवारीही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. यावर मुलीने आक्षेप घेतला. यावरुन संतापलेल्या बापाने तिला मारहाण केली. (Crime News)

यानंतर मुलीच्या आईने मुलीला मारहाणीचं कारण विचारलं. त्यानंतर मुलीने सर्व घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवरील आपबिती ऐकून आईच्या जबर मानसिक धक्का बसला. मात्र आईने न घाबरला मुलीसह पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तक्रारीची दखल घेत वडिलांना ताब्यात घेतलं.

पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354A आणि 354B आणि POCSO कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. लवकरच पीडित मुलीचा जबाब नोंदवला जाणार आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT