Pune Crime News Saam tv news
मुंबई/पुणे

Pune: मोठी बातमी! पुण्यातील अल्पवयीन मुलीनं दिल्लीत आयुष्य संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं कारण काय?

Mysterious Death of Minor Girl: पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने दिल्लीत आत्महत्या केली. ही मुलगी मूळची कर्नाटकातील होती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील बाळांचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या मुलीने दिल्लीत आत्महत्या केली आहे. ही तरूणी मुळची कर्नाटकातील असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासोबत ती पुण्यात मोलमजुरीसाठी आली होती. संबंधित कुटुंबासोबत दिल्लीत गेल्यानंतर तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी तरुणी ही पुण्यातील वडगाव शेरी भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात दीड महिन्यांपासून काम करीत होती. लहान मुलांचे सांभाळण्याचे काम करीत होती. काही दिवसांपूर्वी संबंधित कुटुंब दिल्लीला रवाना झाले. कुटुंबाने त्यांच्यासोबत अल्पवयीन मुलीला देखील नेले.

यासंदर्भातील माहिती मुलीच्या आई वडिलांना देखील देण्यात आली होती. २१ जून रोजी अल्पवयीन मुलगी कुटुंबासोबत दिल्लीतील घरात होती. काही तासानंतर दिल्लीच्या घरातील तळमजल्यावर असलेल्या एका खोलीत तिचा मृतदेह आढळला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर कुटुंबाने थेट स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली.

स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी ही माहिती पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, अल्पवयीन मुलीने नेमकी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? दिल्लीतील घरात तिने आयुष्य का संपवलं? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cockroach : किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करा 'हे' ३ देसी उपाय, नंतर कॉकरोच कधी दिसणारच नाही

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

SCROLL FOR NEXT