nawab malik Saam Tv
मुंबई/पुणे

Nawab Malik: मलिकांची पहाट ईडी अधिकाऱ्यांच्या दर्शनाने, तब्बल तासभर चौकशी, पाहा आतापर्यंत काय-काय घडलं?

महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्यावर ईडीने कारवाई केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्यावर ईडीने कारवाई केली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. तर काहीच वेळात त्यांना अटक करण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलीये (Minister Nawab Malik Is In Custody Of ED).

नवाब मलिक (Nawab Malik) यांची आजची सकाळ ही ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसोबतच झाली. तब्बल एक तासभर मलिकांची चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय.

पाहा संपूर्ण घटनाक्रम -

- 23 फेब्रुवारी 2022 पहाटे 6 च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे (Enforcement Directorate) अधिकारी नवाब मलिक यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले.

- त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनीकडून तब्बल 1 तास नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली.

- चौकशी केल्या नंतर सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं.

- त्यानंतर नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले.

- तिथेही त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेतीच्या वादातून नातेवाईकांत हाणामारी,एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

Pune Metro : पुणेकरांचा नेम नाही, मेट्रोमध्ये केले प्री वेडिंग शूट, नंतर...

Borivali crime : बोरीवली हादरली! कामावर जाताना, नराधमाने वाटेतच डाव साधला, पूलाखाली ओडले अन्....

SSC Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसंदर्भात बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Child Eye Health: मुलांना चष्मा लागू नये वाटत असेल तर काय करावं? पालकांसाठी नेत्ररोग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT