मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी १ तास चौकशी केली. चौकशी केल्यानंतर ०७:३० वाजता नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय.
हे देखील पहा -
काही दिवसांपुर्वी ईडीने इक्बाल कासकर आणि हसीना पारकर यांच्या घरावरही धाड टाकली होती. नबाब मलिकांना आता ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजप विरुद्ध आघाडी उघडली होती. मलिकांना स्वतः भाकित केलं होतं की, मला ईडीची धमकी देण्यात येत आहे, मला ईडी कारवाईचे संकेत देण्यात येत आहे, मलाही फसवण्याचा प्रयत्न होईल असं नवाब मलिकांनी आधीच सांगतिलं होतं. याशिवाय मलिकांवर पाळतही ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
याबाबत ईडीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र महाविकास आघाडीकडून वारंवार आरोप केला जातोय की, केंद्र सरकार आणि भाजप हे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची आतापर्यंत ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.