narayan rane Saam Tv
मुंबई/पुणे

Narayan Rane: "संजय राऊत बाप-बेटे पुरुन उरतील", राऊतांच्या ट्विटला राणेंचा पलटवार

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना जोरदार उत्तर दिलं आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : "संजय राऊत तुला बाप-बेटे पुरून उरतील, तुझी तेवढी पत्रता देखील नाही", असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊतांच्या ट्विटला प्रतिउत्तर दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. तसेच, त्यापूर्वी त्यांनी भाजपचे साडे तीन नेते तुरुंगात जातील असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना जोरदार उत्तर दिलं आहे. (Minister Narayan Rane reaction on Sanjay Rauts tweet).

बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊतांच्या ट्विटवर राणे काय म्हणाले?

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी सकाळी एक खोचक ट्विट केले. राऊत म्हणाले, "बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!".

संजय राऊतांच्या या ट्विटवर आता नारायण राणे (Narayan Rane) यांनी उत्तर देत म्हटलं, "आत जायला तुझ्या हातात काही नाहीये. तुला बाप-बेटे पुरुन उरतील आणि तुझी पात्रताही नाही. आम्हाला दुसऱ्यांच्या हाताची गरज नाही, आमचे हात समर्थ आहेत तुझा समाचार घ्यायला".

"संजय राऊतांची तपासणीची वेळ"

"संजय राऊतांची तपासणी करण्याची वेळ आली आहे. त्यांचा तोल गेलेला आहे. त्यांना काही गोष्टी आठवत नाहीत आणि त्यामुळे ते तणावाखाली चालले आहेत. संजय राऊतांनी काही काळ टीका आणि पत्रकार परिषद घेणे सोडून त्यांच्यावर जे ओढवलं आहे त्याला सामोरे जावं", अससं म्हणत नारायण राणे यांनी राऊतांना सल्ला दिला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Padded Blouse Designs: बॅकलेस आणि डीप नेक साडीवर उठून दिसतील पॅडेड ब्लाऊज, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Maharashtra Live News Update : किल्ले रायगडावर सुरु होणार लाईट अँड साऊंड शो

SCROLL FOR NEXT