Deepak Kesarkar On Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Deepak Kesarkar On Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंबद्दल मंत्री केसरकरांचा आणखी एक गौप्यस्फोट, म्हणाले...

Priya More

Mumbai News: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (Shivsena) पक्षात बंड पुकारत 40 आमदारांसह स्वत:चा वेगळा गट तयार केला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार ठाकरे गटाकडून आणि विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.

अशामध्ये मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करणाऱ्या ठाकरे गटाला राज्याचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. 'भाजपासोबत जाण्याची तुमची इच्छा नव्हती. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे होते. राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलात.', असा टोला त्यांनी लगावला. तसंच, 'संजय राऊत म्हणाले होते की 40 लोकांचे मुडदे पाडणार. शिंदे साहेबांचा अपमान झाला म्हणून ते शिवसेनेतून बाहेर पडले. मी नामर्दाकडून मरणार नाही मी स्वतः ला संपवणार असा बोलणारा आमचा नेता आहे. 80 टक्के समाजकारण करणारा ते खरा शिवसैनिक आहेत. जनतेने युतीला मतदान दिलं होतं'

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकून करण्यात आलेल्या गद्दार दिनावर देखील केसरकरांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'ठाकरे गटाकडून गद्दार दिन केला गेला. शिवसैनिकांनी डोळे उघडले पाहिजेत. तो लाचारी दिन म्हणून साजरा करायला हवा होता. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही लाचार झालात. म्हणून लाचारी दिन साजरा करायला हवा होता.लोकांच्या जावांशी खेळता भ्रष्ट्राचार करता आणि मोर्चे काढता. यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.' अशी टीका त्यांनी केली.

केसरकरांनी पुढे सांगितले की, 'आम्ही आमचे काम करत राहू. जनता आमच्यावर प्रेम करते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून मुंबई घडत आहे. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करत आहे.' तसंच, 'संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना खर बोलण्याची शिकवणी लावण्याची गरज आहे.' असा टोला त्यांनी लगावला.'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही भावांसारखे आहेत. उपमुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांचात गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे.', असा आरोप त्यांनी केला आहे.

पोस्टरवरुन सुरु असलेल्या वादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'औरंगजेबाचे नव्याने प्रेम झाले असेल तर उद्धव ठाकरेंनी तसं सांगावं. आम्ही छ्त्रपतींचे नाव घेऊन राज्य चालवतो. आम्हाला सरदारांना विसरता येणार नाही. बाळासाहेब त्यांना कधीच माफ करणार नाहीत. आम्ही ताठ मानेने शिवसेना चालवतो. तुमच्यापेक्षा जास्त गर्दी आमच्या येथे असते.', असे त्यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार

Maharashtra Politics : महायुतीचा गड भेदण्यासाठी पवार-ठाकरेंचं तगडं प्लॅनिंग, शिंदे-भाजप काय तोडगा काढणार?

Harshvardhan Patil: ....म्हणून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar : बारामतीचा सुपुत्र अन् महाराष्ट्राचा अभिमान... अजित दादांकडून सूरजचं तोंड भरून कौतुक

Gold Silver Rate : ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्याचा भाव कोसळला; वाचा कितीने स्वस्त झाल्या किंमती

SCROLL FOR NEXT