Chhagan Bhujbal  Saam Tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal Health: मंत्री छगन भुजबळ यांची अचानक तब्येत बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Chhagan Bhujbal Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडलीय.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्याची समस्या जाणवताच छगन भुजबळ यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आज त्यांना अधिक त्रास जाणवल्याने दुपारी पुणे येथून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. भुजबळ हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे येथे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची तब्येत खालवली. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन छगन भुजबळ यांच्या कर्यालयाकडून करण्यात आलंय.

९० जागा मागितल्या?

महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केलीय. महायुतीत अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळणार? असा प्रश्न केला जात असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्याच उत्तर दिलंय. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे जागावाटपाबाबत सगळं पाहत आहेत. मी कुठल्याही चर्चेत जास्त लक्ष घालत नाहीये. तसेच विधानसभेसाठी किती जागा मागितल्या हे त्यांनी मला सांगितले नाही. पण त्यांनी ८० ते ९० जागा मागितल्या गेल्या आहेत, अशी माहिती काही दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली होती.

जरांगेच्या आंदोलनावरून रोहित पवार, राजेश टोपेंवर हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या आंदोलनावरून छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्या हल्लाबोल केला होता. ''आंतरवाली सराटीमध्ये दगडफेकीला ज्या वेळेला सुरुवात झाली, लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेले होते. त्यावेळी रोहित पवार आणि राजेश टोपे या दोघांनी त्यांना तिथे परत आणून बसवल्याचा दावा भुजबळ यांनी केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT