Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी खरंच शिंदेसेनेत प्रवेश केला का? स्वत: सांगितले सत्य

Thane Politics: मुंब्र्यातील नगरसेविका सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामागचे सत्य युनूस शेख यांनी सांगितले.

Priya More
  • सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा

  • सहर शेख एमआयएमची सर्वात जास्त चर्चेत राहिलेली नगरसेविका आहे

  • युनूस शेख यांनी शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चेवर दिली प्रतिक्रिया

  • त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त फेटाळून लावले

महापालिका निवडणुकीच्या वेळी मुब्र्याला हिरवा करून टाकण्याचे विधान करणारी आणि नेहमी चर्चेत राहणारी एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे वडील आता चर्चेत आले आहेत. सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शिंदेसेनेत त्यांना मोठं पद देखील मिळालं असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचा फोटो देखील समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर होणाऱ्या या चर्चांवर आता युनूस शेख यांनी प्रतिक्रिया दिली. यामागचे सत्य काय आहे ते त्यांनी सांगितले.

सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला असल्याची चर्चा ठाण्यात सुरू आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युनुस शेख यांची शिंदेसेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्षपदी नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले असल्याचे दिसत आहे. युनूस शेख यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत शिंदेसेनेत प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले.

युनूस शेख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात आली आहे. यामध्ये काही तथ्य नाही आहे. माझा ४० वर्षांपासून केबलचा व्यवसाय आहे. अखिल भारतीय केबल सेना असे या संघटनेचे नाव आहे. या संघटनेमध्ये अनेक व्यावसायिक सभासद आहेत. मी सुद्धा या संघटनेत आहे. मुळात ही केबल सेना शिंदेसेनेच्या अखत्यारित येते.'

'या संघटनेत माझी आता कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मला आता या परिसरातील केबल ऑपरेटरला सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करायची आहे. ही केबलसेना शिंदेसेनेची आहे. त्याचे अध्यक्षपद घेऊनही मी शिंदेसेनेचा भाग नाही.', असे युनूस शेख यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त हे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून यवतमाळमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी

भाजपला सर्वात मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांसह नेते-पदाधिकाऱ्यांचा 'सपा'त प्रवेश

नवरात्रीत भोंडल्यासाठी 5 खास उखाणे; जे ऐकून सर्वांनाच आनंद होईल

Pimpri-Chinchwad : २-३ दिवसांत करा पिंपरी-चिंचवडची सफर, ऑक्टोबरमध्ये ट्रिपसाठी 'ही' ७ ठिकाणे बेस्ट!

October Heatwave: ऑक्टोबरमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्या! उष्णतेमुळे होऊ शकतो त्रास, पालकांनो या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT