Thane Bhiwandi double murder BJP youth leader Praful Tangdi killed : 
मुंबई/पुणे

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

Thane Bhiwandi Crime : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील खार्डी येथे रात्री ११ वाजता दुहेरी हत्याकांड घडलं. हत्या झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांचा समावेश आहे.

Namdeo Kumbhar

  • भिवंडीतील खार्डी येथे दुहेरी हत्याकांड, भाजप युवा नेत्याची हत्या

  • प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांचा धारदार शस्त्राने खून

  • धीरज तांगडी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास आणि कसून चौकशी सुरू

Thane Bhiwandi double murder BJP youth leader Praful Tangdi killed : ठाण्यातील भिवंडी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. रात्री ११ वाजता भाजप पदाधिकाऱ्यासह एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झालेल्यांमध्ये भाजप नेत्याचाही समावेस आहे. भिवंडीमधील जिल्हा उपाध्यक्षाची हत्या झाल्याने ठाण्यामध्ये एकच खळबल उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची तात्काळ तपासणी करण्यात येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. तर धीरज तांगडी जखमी असून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल तांगडी हे भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भिवंडीत तालुक्यातील खार्डी येथे रात्री ११ वाजता दुहेरी हत्याकांडाचा थरार घडला. या घटनेनंतर भिवंडी आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक वर्षा पूर्वी प्रफुल्ल तांगडी यावर हल्ला झाला होता, त्यानंतर आता पुन्हा हल्ला करण्यात आला. चार ते पाच हल्लेखोरांनी हल्ला करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवण्यात आला आहे. जखमी धीरज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. भिवंडी पोलिसांकडून खार्डीमधील घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे. पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आपल्या जे. डी. टी. इंटरप्रायझेस कार्यालयात दोन सहकाऱ्यांसह बसले होते. त्याचवेळी चार ते पाच हल्लेखोरांनी तिथे येऊन धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक सहकारी जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

महापालिका रणधुमाळीत मोठा ट्विस्ट; ठाकरे बंधूचा राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव, नव्या समीकरणाची नांदी? VIDEO

Foot Care: गरम पाण्यात पाय ठेवून बसण्याने होतील 'हे' फायदे

Winter Skin Care Tips: महागड्या क्रीम कशाला? हिवाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी ५ घरगुती उपाय

Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT