Mhada News  Saam tv
मुंबई/पुणे

MHADA Home: "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य" शिल्लक घरांसाठी म्हाडाची बंपर लॉटरी; कधी अन् कुठे अर्ज करणार? वाचा

Apply Online for Leftover MHADA Pune Flats Starting Today: पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिका आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Bhagyashree Kamble

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिका आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आज दुपारी १२ वाजल्यापासून यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र अर्जदारांना दिनांक १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन पद्धतीने पुणे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येणार आहे.

कोणत्या योजनेतील सदनिका?

पुणे म्हाडाकडून राबविण्यात आलेल्या १५% सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २०% सर्वसमावेशक योजनेअेंतर्गत सोडत घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही सदनिका शिल्लक राहिल्या आहेत. या सदनिकांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य प्रवर्गातील गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

म्हाडाच्या घरांचे वितरण कसे केले जाणार?

विकासकांकडून शिल्लक सदनिकांची यादी मिळताच, त्या सदनिका प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया सतत सुरू राहणार असल्याची माहिती आहे.

म्हाडाच्या घरासाठी इथे अर्ज भरा

इच्छुक आणि पात्र लाभार्थी पुणे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करू शकतात. असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आणि पुणे मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT