MHADA MUMBAI LOTTERY 2026 DRAW DATE ANNOUNCED FOR 2,640 HOMES | AUGUST 6 ONLINE LOTTERY  Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Mumbai MHADA Lottery Update News : मुंबईतील म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. ६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन सोडत होणार असून ७५ हजारांहून अधिक अर्जदार निकालाची प्रतीक्षा करत आहेत.

Alisha Khedekar

  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

  • ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता म्हाडाच्या २,६४० घरांची ऑनलाईन सोडत होणार

  • यंदाच्या सोडतीसाठी ७५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त

  • प्रत्येक घरासाठी २८ ते २९ अर्जदार स्पर्धेत

  • विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, पवईसह मुंबईतील विविध भागांमध्ये घरे उपलब्ध

मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. या घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार असून, ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता अधिकृतपणे सोडतीची तारीख जाहीर झाल्याने अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोडतीचा निकाल कार्यक्रमानंतर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिला जाणार आहे. यंदाच्या सोडतीसाठी ७५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एका घरासाठी सरासरी २८ ते २९ अर्जदारांमध्ये स्पर्धा असल्याचे चित्र आहे. या सोडतीत कोणाचे नशीब उजळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यंदाच्या घरांच्या किंमतींवरून मोठी चर्चा झाली होती. विशेषतः विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील १२२१ घरांच्या किंमती म्हाडाने नंतर ७.५ टक्क्यांनी कमी केल्या. तरीही अनेकांनी या घरांच्या किंमती सामान्य नागरिकांना न परवडणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अर्ज प्रक्रियेदरम्यान काही गटांसाठी रक्कम १ लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आल्याने अर्जदारांचा आर्थिक भार वाढल्याचीही चर्चा होती.

या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आणि अँटॉप हिलसह मुंबईतील विविध भागांतील घरे उपलब्ध आहेत. यामध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी एकूण २,६४० घरांचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT