MHADA Saam Digital
मुंबई/पुणे

MHADA : म्हाडाच्या जागेवर ६० होर्डिंग अनधिकृत; केवळ दोन होर्डिंगलाच एनओसी

MHADA News : घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १७ जणांनी प्राण गमावले आहेत. म्हाडाने आपल्या जागेवर असलेल्या होर्डिंगचा शोध घेतला असून ६२ पैकी ६० होर्डिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे.

Sandeep Gawade

घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १७ जणांनी प्राण गमावल्यानंतर मुंबईतील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्याची दखल घेत म्हाडाने आपल्या जागेवर असलेल्या होर्डिंगचा शोध घेतला असून ६२ पैकी ६० होर्डिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे. संबंधितांनी पालिकेकडून होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी घेतली असली तर जागा मालक म्हणून एनओसी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यावर कारवाईचा बडगा उभारण्याची म्हाडाने तयारी सुरू केली आहे.

मुंबई शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहीराती करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून हायवे शेजारी, इमारतींवर होर्डिंग उभारण्यास पालिकेकडून परवानगी दिली जाते. मात्र मुंबईत बहुतांश ठिकाणी म्हाडाचे भूखंड आणि इमारती आहेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणी होर्डिंग उभारण्यासाठी पालिकेकडून परवानगी घेतानाच म्हाडाची एनओसी घेणे बंधनकारक आहे.

मात्र म्हाडाने केलेल्या तपासणीत त्यांच्या जागेवर ६२ होर्डिंग असल्याचे अढळून आली आहेत. त्यापैकी केवळ दोन होर्डिंगलाच म्हाडाने एनओसी दिली आहे. उर्वरित होर्डिंग बेकायदेशीर ठरत असल्याने त्यांची परवानगी रद्द करावी असे पत्र पालिकेला दिल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

भाडे आणि व्याज वसूल केले जाईल

म्हाडाची एनओसी न घेता होर्डिंग उभारणे किंवा बांधकाम करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्या होर्डिंगला एनओसी नाही ती संबंधितांनी तत्काळ काढावीत अन्यथा आम्ही ती तोडून काढून आणि त्याचा खर्च वसूल करू असं म्हाडाने म्हटले आहे. तसेच बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या होर्डिंगच्या माध्यमातून म्हाडाला कोणतेही भाडे किंवा महसूल मिळत नाही. त्यामुळे होर्डिंग उभारल्यापासूनचे भाडे आणि त्यावरील व्याज असे दोन्ही वसूल केले जाईल असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baal Aadhaar Card: नवजात बालकांचं आधार कार्ड कसं काढायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस वाचा

Mobile Recharge Hike: मोबाईल रिचार्ज होणार महागणार; Jio-Airtel-Vi चा ग्राहकांना दणका

Maharashtra Live News Update: मला संपून टाकण्याची ऑन एअर धमकी दिली- धनंजय मुंडे

Maharashtra Politics: स्थानिक नेत्यांनी माझा घात केला, भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा; ढसाढसा रडत म्हणाले...

KDMC Election : महापालिका निवडणुकीपूर्वी कल्याणमध्ये मतदार यादीत गोंधळ; मनसेने केली पोलखोल, ३२ हजार दुबार नावे उघड

SCROLL FOR NEXT