Mega Block : ‘जम्बो ब्लॉक’चा लाखो प्रवाशांना फटका; सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीची द्यावी लागली परवानगी

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. याचा लाखो प्रवाशांना फटका बसला आहे.
Mega Block
Mega BlockSaam Digital
Published On

मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. याचा लाखो प्रवाशांना फटका बसला आहे. दरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस मेगा ब्लॉक संपेपर्यंत ही परवानगी असणार आहे, असं परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसूचनेद्वारे कळविलं आहे. विलंब आणि प्रचंड गर्दीचा अंदाज घेऊन, रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.

मध्य रेल्वेने घेतलेल्या जम्बोब्लॉकमुळे आज अनेक सकाळी मुंबईकर चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र सायंकाळी घरी परत जाताना त्यांनी बस आणि एसटीचा पर्याय निवडल्याने सीएसएमटी स्थानकात रोजच्या एवढी गर्दी पाहायला मिळत नाही. काही चाकरमान्यांनी वर्क फ्रॅाम होमचा पर्याय निवडला असून रेल्वेने दुसऱ्या किंवा ४ थ्या रविवारी हा ब्लॅाक घ्यायला हवा होता, असंही काही नागरिकांच म्हणणं आहे.

Mega Block
Mumbai News: जम्बो मेगाब्लॉकचा फटका! पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; मुलुंड ते भांडूपपर्यंत वाहनांच्या रांगा

मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक सुरू झालाय. त्यात उद्या पासून विकेंड यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी झालीय. चाकरमानी घराकडे रस्ते मार्गाने जाताहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालीय. मध्य रेल्वेच्या लोकलला ब्लॉक असल्यानं चाकरमान्यांची दुहेरी कोंडी होते. टोल नाक्यावर गर्दी वाढत असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखलवली. गर्दी असतानाही टोल आकारला जात होता. मात्र साम टीव्हीनं टोल नाक्यावरील गर्दी दाखवल्यानंतर गाड्यांना टोल माफी देऊन पुढे जाण्यास सांगण्यात आलंय.

Mega Block
Pune Porsche Accident Case : २०२५ पर्यंत 'ती' महागडी कार रस्त्यावर उतरवण्यास मनाई; त्या अल्पवयीन मुलाला या वर्षी मिळणार वाहन परवाना?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com