Mumbai Fire : आग लागताच कामगार पळत सुटले; ताडदेवच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग, Video

Mumbai Fire News Update : ताडदेव परिसरात इंडस्ट्रिअल इस्टेटला भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परिसरात धुराचे लोळ पसरले असून १०८ रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत.
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsSaam Digital

ताडदेव परिसरात इंडस्ट्रिअल इस्टेटला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परिसरात धुराचे लोळ पसरले असून १०८ रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत. मात्र सदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टीकच्या गोदामालाही ही आग लागली आहे. त्यामुळे आगीचा भडका उडालेला आहे.

इंडस्ट्रिअल इस्टेट प्लास्टीकच्या गोदामाला अचानक आग लागली आणि आगीचा भडका उडाला. त्यामुळे कंपनी मधील कामगार वाट दिसेल तिकडे पळत सुटले. प्लाय आणि बॅटरीची दुकान होती तसेच प्लास्टिकचे गाळे होते त्या सगळ्याला आग लागली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान जवळवास तासभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू झालं आहे.

Mumbai Fire News
Mumbai News : गर्लफ्रेंडशी झालेल्या भांडणातून मुंबई विमानतळ, ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; माथेफीरूच्या आवळल्या मुसक्या

नागपूरच्या हिंगणा रोडवरील अंबाझरी डायव्हर्सिटी पार्कला आग

 नागपूरमधील अंबाझरी डायव्हरसिटी पार्कच्या फिल्टर प्लाँटजवळ गुरुवारी आग रात्री उशीरा आग लागली होती. हा संपूर्ण परिसर जंगलाचा यापूर्वीही या भागात आगीच्या घटना घडल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पहाटे ३.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आगीच कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र ५ हेक्टरवरील जंगलातील गवत जळून खाक झालं आहे.

Mumbai Fire News
Mumbai News: जम्बो मेगाब्लॉकचा फटका! पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; मुलुंड ते भांडूपपर्यंत वाहनांच्या रांगा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com