Mhada Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Mhada Lottery Update: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या २,६४० घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या.

Priya More
  • म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक

  • २,६४० घरांसाठी आतापर्यंत ८४ हजारांहून अधिक अर्ज दाखल

  • विक्रोळीतील कन्नमवार नगर प्रकल्पाला सर्वाधिक प्रतिसाद

  • अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ मे रात्री ११.५९ पर्यंत

संजय गडदे, मुंबई

मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २,६४० घरांसाठी सुरू असलेल्या या सोडतीला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल ८४ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी जवळपास ५९ हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सहभाग निश्चित केला आहे. अर्ज करण्यासाठी आता केवळ तीन दिवस उरले असून २८ मे रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

यंदाच्या सोडतीत विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर प्रकल्प सर्वाधिक चर्चेत आहे. आधुनिक सुविधा, प्रशस्त घरे, प्रत्येक घराला बाल्कनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोफत पार्किंगची सुविधा यामुळे घरखरेदीदारांचा या प्रकल्पाकडे मोठा ओढा दिसून येत आहे. उच्च उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या ६१० सदनिकांच्या किमतीत ७.५ टक्क्यांची कपात केल्याने या प्रकल्पाची आकर्षकता आणखी वाढली आहे.

कन्नमवार नगर परिसरातील सुमारे १७० अनधिकृत दुकाने हटवल्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुबक झाला असून प्रकल्पाला नवी ओळख मिळत आहे. प्रकल्पामध्ये सीसीटीव्ही सुरक्षा, गेटेड एंट्री, जॉगिंग ट्रॅक, जिम, पोडियम पार्किंग, मुलांसाठी खेळाची जागा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एसटीपीसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

म्हाडाच्या या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध असून गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, घाटकोपर, वडाळा, दादर, पवईसह मुंबईतील विविध भागांमध्ये ही घरे उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी म्हणून या सोडतीकडे पाहिले जात आहे. इच्छुक नागरिकांनी मुदत संपण्यापूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन म्हाडा मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगावर पुन्हा मोठं संकट कोसळणार; महायुद्धाचा भडका उडणार, वैश्विक राजकारणात नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी! पुण्यात जमावबंदीनंतर रात्री १० नंतर खाद्यपदार्थ विक्री अन् पानटपऱ्या बंद

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही

Palak Paneer Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट पालक पनीर रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT