Ghatkopar Tourism : 'घाटकोपर'मधील विरंगुळ्याचे ठिकाण, मुंबईच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात घालवा निवांत वेळ

Shreya Maskar

घाटकोपर

घाटकोपर हे मुंबईचे एक प्रमुख पूर्व उपनगर असून, तेथील सुप्रसिद्ध 'खाऊ गल्ली', गजबजलेली गुजराती-जैन संस्कृती आणि शहरातील खरेदी , मनोरंजनाच्या सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असलेला 'आर सिटी मॉल'यासाठी ते सर्वत्र प्रसिद्ध आहे.

Ghatkopar | google

घाटकोपर हिल ट्रेल

घाटकोपर येथे 'घाटकोपर हिल ट्रेल' हे सुंदर विरंगुळ्याचे ठिकाण आहे. स्थानिक लोक येथे सकाळी मॉर्निंग वॉकला येतात. तुम्ही वीकेंडला या थंडगार ठिकाणाला भेट द्या.

Ghatkopar Hill Trail | google

हायकिंग

'घाटकोपर हिल ट्रेल' हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. या डोंगररांगा उद्यानाच्या दक्षिण-पूर्व भागात येतात. हायकिंग साठी हे उत्तम ठिकाण आहे.

Hiking | google

इतर नावे

'घाटकोपर हिल ट्रेल' खंडोबा टेकडी आणि हॉर्सशु व्हॅली या नावाने देखील ओळखले जाते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट देखील करू शकता.

Other Names | google

कधी भेट द्यावी?

सकाळच्या वेळी या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. तसेच पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग बहरतो. येथे तुम्ही पक्षी निरीक्षण करू शकता.

When to Visit? | google

निसर्ग सौंदर्य

'घाटकोपर हिल ट्रेल'च्या शिखरावर पोहोचल्यावर पवई तलाव आणि आजूबाजूच्या शहरी परिसराची उंचावरून दिसणारी मनमोहक दृश्ये पाहण्याचा आनंद मिळतो.

Natural Beauty | google

मुंबईतील पर्यटन स्थळे

गेटवे ऑफ इंडिया, वांद्रे-वरळी सी लिंक, एलिफंटा लेणी, मरीन ड्राइव्ह, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हँगिंग गार्डन्स हे मुंबईतील सुंदर पिकनिक स्पॉट आहेत.

Tourist Attractions in Mumbai | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : हिरव्यागार डोंगरमाथ्यावर वसलाय भव्य किल्ला, पनवेल गाडी पकडा अन् बेलापूरला उतरा

Belapur | saam tv
येथे क्लिक करा...