Belapur : हिरव्यागार डोंगरमाथ्यावर वसलाय भव्य किल्ला, पनवेल गाडी पकडा अन् बेलापूरला उतरा

Shreya Maskar

बेलापूर

बेलापूर किल्ला १६ व्या शतकातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे, जे नवी मुंबईतील (पनवेल) सीबीडी बेलापूर येथे आहे.

Belapur | google

बेलापूर किल्ला

बेलापूर किल्ला पनवेल खाडीच्या मुखाशी एका छोट्या टेकडीवर वसलेला आहे. किल्ल्यावरून पनवेल खाडीचे विहंगम दृश्य पाहता येते.

Belapur Fort | google

पनवेल खाडी

बेलापूर किल्ल्यावर जाण्यासाठी छोटा ट्रेक करावा लागतो. तुम्ही येथे उन्हाळ्यात वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप एन्जॉय करू शकता.

Panvel | google

सत्ता

सिद्दी, पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिश या सत्तांसाठी बेलापूर किल्ला एक अत्यंत महत्त्वाचा टेहळणी बुरूज म्हणून कार्यरत होता.

Rulers | google

उद्देश काय?

इ.स. १५७० च्या सुमारास जंजिऱ्याच्या सिद्दींनी बांधलेल्या बेलापूर किल्ल्याचा मुख्य उद्देश सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणे आणि पनवेल खाडीच्या मुखापासून या प्रदेशाचे रक्षण करणे हा होता.

Purpose | google

बहुसांस्कृतिक इतिहास

बेलापूर किल्ल्याची मालकी अनेकदा बदलली. तो सिद्दींकडून पोर्तुगीजांकडे, त्यानंतर मराठ्यांकडे आणि शेवटी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित झाला.

Multicultural History | google

मराठ्यांची गाथा

मराठ्यांनी या किल्ल्याचे नाव 'बेलापूर' असे ठेवले. त्यांचे नेते चिमाजी आप्पा यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की, जर त्यांनी हा प्रदेश यशस्वीरित्या पुन्हा जिंकून घेतला, तर ते येथील देवतांना 'बेली'ची (बेलफळाच्या झाडाची) पाने अर्पण करतील.

The Maratha Saga | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : मराठवाड्यातील जालना पिकनिकचा हॉटस्पॉट, उन्हाळी सुट्टीत फिरा 'ही' ५ सुंदर ठिकाणे

Jalna Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...