Shreya Maskar
जालना हे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील एक प्रमुख व्यापारी आणि ऐतिहासिक शहर आहे. जालना'स्टील सिटी' म्हणून ओळखले जाते. उन्हाळी सुट्टीत येथे नक्की भेट द्या.
मराठवाडा हा मध्य महाराष्ट्रातील एक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. आपल्या प्राचीन व युनेस्को-सूचीबद्ध गुंफा मंदिरांसाठी, गहन आध्यात्मिक महत्त्वासह आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसाठी तो जगप्रसिद्ध आहे. वारसा, इतिहास आणि धार्मिक तीर्थयात्रेचे हे एक विशाल केंद्र आहे.
मोती बाग हे जालना शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, मोती तलावाच्या नजीक वसलेले आहे. शहरांतर्गत सहलीसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण असून, येथे हिरवीगार लॉन्स , मुलांसाठी मिनी-ट्रेन आणि संगीतमय कारंजे यांसारखी आकर्षणे आहेत.
जालना किल्ला ज्याला 'मस्तगड' किंवा 'किल्ला असफिया' म्हणूनही ओळखले जाते. हा महाराष्ट्रातील जालना शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.
घाणेवाडी तलाव हा महाराष्ट्रातील जालना शहराला पाणीपुरवठा करणारा एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य जलाशय आहे. तलावाचा परिसर हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला आहे. येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन घडते.
लोणार सरोवर हे जालना जिल्ह्याजवळच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने जालन्याहून येथे जाणे अतिशय सोयीचे पडते. उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले हे पृथ्वीवरील एकमेव मोठे सरोवर आहे.
तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेला नसाल तर वीकेंड जालना येथे ट्रिप प्लान करू शकता. येथे राहण्याची-खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.