MHADA reserved flat for MLA priced at ₹9.55 lakh, sparking outrage among common homebuyers. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

MHADA flat price for MLAs and MPs : म्हाडाच्या लॉटरीमध्ये आमदारांसाठी फक्त ९.५५ लाखांचे घर राखीव ठेवण्यात आले आहे. सामान्यांसाठीच्या घरांपेक्षा किंमत मोठ्या फरकाची आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कायद्यानुसारच ही राखीव तरतूद असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

  • म्हाडाची ५,२८५ घरांसाठी लॉटरी, अर्ज १४ जुलैपासून.

  • किमती ९.५ लाख ते ८५ लाख, अत्यल्प-मध्यम गटासाठी.

  • ९५ घरे आमदार-खासदारांसाठी राखीव, नागरिक नाराज.

  • कायद्याने राखीव घरे बंधनकारक, नसेल अर्ज तर खुल्या गटाला.

  • अर्ज मुदत १३ ऑगस्ट, सोडत ३ सप्टेंबर.

MHADA Konkan Board affordable housing scheme : मुंबई आणि उपनगरात म्हाडाकडून ५ हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. सोमवारपासून अर्जाची प्रक्रिया सुरूवात झाली. म्हडाकडून काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये काही घरे आमदार आणि खासदारांसाठी राखीव आहेत, त्याची किंमत वाचून अनेकांचे डोळे नक्कीच विस्फारतील. होय, आमदारासाठी राखीव असणाऱ्या म्हाडाच्या घराची किंमत फक्त साडेनाऊ लाख आहे. सर्वसामान्य लोकांसाठीच्या घरांच्या किंमतीत आणि आमदार महोदयासाठी राखीव असलेल्या घराच्या किंमती मोठा फरक दिसत आहे.

आमदार, खासदारांसाठीच्या राखीव घराची किंमत म्हाडाकडून फक्त साडेनऊ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकतीच पाच हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी जाहीर केली, त्याची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हाडाकडून वेगवेगळ्या राखीव गटांप्रमाणाचे आमदार आणि खासदारांसाठी ९५ खरे राखीव ठेवली आहेत. कल्यामध्ये आमदार-खासदारासाठी एक घर राखीव ठेवण्यात आलेय, त्याची किंमत फक्त नऊ लाख ५५ हजार ८०० रुपये एवढी आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील हे घर राज्यातील आजी-माजी आमदार-खासदारांसाठी म्हाडाकडून राखीव ठेवण्यात आले आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील आमदार-खासदार कोण? या घरासाठी कोण अर्ज करणार? याची चर्चा सुरू आहे.

आमदार-खासदारासाठी कुठे आहेत राखीव घरे ?

ठिकाण - उत्पन्न गट - किंमत (लाखांत) घरांची संख्या

कल्याण - अत्यल्प - ९.५५ ते ११.३२ - १

टिटवाळा - अल्प - १७.१८ ते ३०.५६ - १

नवी मुंबई - अत्यल्प - ८.५९ - २

कल्याण - अत्यल्प - १९.६० ते १९.९५ - १

विरार - अत्यल्प - १३.२९ - १

ठाणे - अल्प - २० ते २१ - १

वसई - अल्प - १४ ते १८-१

कल्याण अल्प - २१-२२ - ४९

शिरढोण - अल्प - ३५.६६ - ११

Why are MHADA flats cheaper for politicians

म्हाडाच्या कोकण मंडळाने ५,२८५ घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. ही घरे अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी आहेत. घरांच्या किमती ९.५ लाखांपासून ५२ लाखांपर्यंत आहेत. यापैकी ११ ठिकाणी ९५ घरे अत्यल्प आणि कमी उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. परंतु, महागड्या गाड्यांमधून फिरणारे आमदार-खासदार ही घरे घेणार का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. यासंदर्भात म्हाडाकडे चौकशी केली असता, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास कायदा १९७६ नुसार आमदार-खासदारांसाठी काही घरे राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, त्यांच्याकडून अर्ज न आल्यास ही घरे खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना दिली जातात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

म्हाडाच्या २०२५ च्या लॉटरी संदर्भातील तुमच्या मनातील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे

म्हाडाची लॉटरी कधी जाहीर झाली?

१४ जुलै २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली.

लॉटरीत किती घरे आणि कोणत्या गटासाठी आहेत?

५,२८५ घरे; अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी.

आमदार-खासदारांसाठी किती घरे राखीव आहेत?

कल्याण, ठाण्यासह ११ ठिकाणी ९५ घरे राखीव आहेत.

राखीव घरांसाठी कायदेशीर तरतूद काय आहे?

१९७६ च्या कायद्याने आमदार-खासदारांसाठी घरे राखीव बंधनकारक; नसेल अर्ज तर खुल्या गटाला.

लॉटरी सोडतीची तारीख आणि ठिकाण काय?

३ सप्टेंबर २०२५, ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह.

म्हाडाच्या घरासाठी कोणत्या वेबसाईटवरून अर्ज करावा?

म्हाडाच्या घरासाठी housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात?

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • अधिवास प्रमाणपत्र

  • उत्पन्नाचा पुरावा (वेतन पावती/आयकर विवरणपत्र)

  • रद्द केलेला धनादेश

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • ओळख/पत्त्याचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट)

  • विशेष श्रेणीसाठी: जातीचे/आरक्षण प्रमाणपत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food Adulteration: तुमच्या ताटातील पनीरमध्ये कोण विष टाकतंय? भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Chanakya Niti : 2025 मध्ये यश,पैसा फ्रीडम पाहिजे? मग या ५ सवयी आत्ताच सोडा

Maharashtra Live News Update: धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का

Uttarakhand: उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Solapur Clash: सगळं सुरळीत चालू होतं,पण...; बैठकीत राडा का झाला? जन्मजयराजे भोसलेंनी दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT