MHADA Lottery 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery 2024: अखेर म्हाडाची लॉटरी जाहीर, विजेत्यांची यादी कुठे आणि कधी पाहाल?

MHADA Lottery 2024 Announced : माडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधण्यात आलेल्या २०३० घरांसाठीची लॉटरी आज जाहीर करण्यात आली. तुम्हाला घर लागलं का हे कसं आणि कुठे पाहाल. वाचा सविस्तर....

Priya More

मुंबईमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. माडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधण्यात आलेल्या २०३० घरांसाठीची लॉटरी आज जाहीर करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याचे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

या सोडतीसाठी १ लाख १३ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल करण्यात आले होते. पण यापैकी १ लाख १३ हजार ८११ जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते. यामधील २६९ अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे उर्वरीत १ लाख १३ हजार २४२ अर्जदारांमधून विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, अर्जदारांसाठी म्हाडाची लॉटरी विजेत्यांची यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे.

म्हाडाच्या या २०३० घरांसाठी ९ ऑगस्ट २०२४ ते १९ सप्टेंबर २०२४ या काळात लॉटरी प्रक्रिया राबवण्यात आली होती. अर्जदारांना म्हाडाच्या युट्यूब, फेसबुक पेजवरून लॉटरीचा निकाल पाहायला मिळणार आहे. म्हाडाची अधिकृत वेबसाईटवर https://housing.mhada.gov.in आणि युट्यूबवर https://www.youtube.com/live/9F6Kss347WI याठिकाणी तुम्हाला निकाल पाहायला मिळतील.

म्हाडा लॉटरी २०२४ मध्ये ज्यांना घरांची लॉटरी लागली आहे त्यांना गोरेगाव, मालाड, जुहू, दादार, वरळी, अंधेरी, अँटॉप हिल, जुहू, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई यासह अन्य ठिकाणी घरं मिळणार आहे. पहाडी गोरेगावमधील मध्यम आणि उच्च गटातील घरांसह पवईतील उच्च गटातील घरांच्या लॉटरीमध्ये आपले नाव येतेय की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हाडाने याठिकाणच्या घरांच्या किंमती कमी केल्या होत्या त्यामुळे अनेकांनी या लॉटरीसाठी अर्ज केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT